जिते येथे उभारण्यात येणार २७० एमएलडी क्षमतेच्या जल प्रक्रिया केंद्र








जिते येथे उभारण्यात येणार २७० एमएलडी क्षमतेच्या जल प्रक्रिया केंद्र

पनवेल(प्रतिनिधी) व्हीए टेक डब्ल्यूएबीएजी (‘व्हीव्हीएबीएजी’) ह्या प्युअर-प्ले जल तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय बहुराष्ट्रीय समूहाने, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अर्थात सिडकोसाठी रायगड जिल्ह्यातील जिते येथे प्रतिदिवस २७० दशलक्ष लिटर (एमएलडी) एवढ्या क्षमतेच्या जल प्रक्रिया केंद्राची (व्हीव्हीटीपी) रचना, बांधकाम व कार्यान्वयनाचा करार प्राप्त केला आहे.




नवी मुंबईतील भविष्यकाळातील पाण्याची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ह्या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. हेटवणे धरणातील पाण्यावर प्रस्तावित २७० एमएलडी क्षमतेने प्रक्रिया केली जाणार आहे आणि ह्या पाण्याचे उदंचन (पम्पिंग) करून ते सध्या अस्तित्वात असलेल्या विहाल येथील मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हॉयरमध्ये (जलाशय) पुढील वितरणासाठी आणले जाणार आहे. ह्या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये, २७० एमएलडी क्षमतेच्या जल प्रक्रिया प्लाण्टची रचना (डिझाइन), इंजिनीअरिंग, पुरवठा, बांधकाम, स्थापना व हस्तांतर ह्यांचा समावेश होतो


. ह्यांत एका स्वच्छ पाण्याच्या उदंचन केंद्राचा समावेशही आहे. हा प्रकल्प कामाला आरंभ झाल्यापासून ४२ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर कार्यान्वयन व देखभाल (ओअँडएम) कालावधी १५ वर्षांचा आहे. हाय-सस्पेण्डेड (अधिक घनतेचा) घनकचरा काढून टाकण्यासाठी हया प्लांटमध्ये उच्च दर्जाचे क्लॅरिफायर्स (निष्कासक टाक्या) वापरले जातील. त्यानंतर रॅपिड ग्रॅव्हिटी सॅण्ड फिल्टर्सद्वारे पाण्यावर प्रक्रिया केली जाईल आणि क्लोरीनच्या मदतीने पाणी निर्जंतुक केले जाईल.



व्हीए टेक डब्ल्यूएबीएजीच्या इंडिया क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शैलेश कुमार हा कार्यादेश (ऑर्डर) प्राप्त झाल्याबद्दल म्हणाले, “आमच्यासाठी हे महत्त्वाचे व धोरणात्मक यश आहे. कारण, सिडकोच्या ह्या ब्रेकथ्रू कार्यादेशाद्वारे आम्ही महाराष्ट्रात पुन्हा एकदा डीबीओ क्षेत्रात प्रवेश करत आहोत. कठोर स्पर्धा असलेला हा प्रकल्प आम्ही आमचे तंत्रज्ञानात्मक श्रेष्ठत्व व स्पर्धात्मकता ह्यांच्या जोरावर प्राप्त केला आहे. आमच्या क्लाएंटनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ह्या भागातील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत होईल आणि आमच्या प्रवासातीलही तो महत्त्वाचा संदर्भ ठरेल.”



·  


थोडे नवीन जरा जुने