पनवेल शहर पोलिसांनी केला सराईत मोटारसायकल चोर गजाआड

पनवेल शहर पोलिसांनी केला सराईत मोटारसायकल चोर गजाआड
पनवेल दि १२ (संजय कदम): पनवेल शहर परिसरात मोटारसायकली चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि प्रकाश पवार, पोहवा अविनाश गंथडे, पोना मिथुन भोसले, अमोल पाटील, महेश पाटील, अशोक राठोड, विशाल दुधे आदींचे पथक सदर आरोपीचा शोध घेत असताना सराईत मोटारसायकल चोर पनवेल परिसरात आल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे पोना मिथुन भोसले याला मिळाली 

त्यानुसार सदर पथकाने मोटारसायकलवरून चाललेल्या आरोपी साहिद सलीम खान याला अडवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पनवेल परिसरातून त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चोरल्याचे कबुल केले तसेच या पूर्वी सुद्धा अजून एक मोटारसायल चोरी केल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीच्या दोन्ही मोटारसायकली हस्तगत केल्या असून त्याच्या अटकेने अजून काही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. थोडे नवीन जरा जुने