सिडकोमार्फत मौजे पारगाव डुंगी परिसरातील रखडलेली कामे तातडीने पुर्ततेस देण्यास सरपंच अहिल्या नाईक यांची मागणीसिडकोमार्फत मौजे पारगाव डुंगी परिसरातील रखडलेली कामे तातडीने पुर्ततेस देण्यास सरपंच अहिल्या नाईक यांची मागणी
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः पनवेल तालुका परिसरात सिडकोमार्फत अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्यातील मौजे ः पारगाव डुंगी परिसरातील अनेक कामे सिडकोच्या दिरंगाईमुळे रखडली आहेत. तरी सदरची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पुर्ततेस नेण्याची मागणी पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक यांनी सिडकोचे व्यवस्थापक संचालक राजेश पाटील यांची भेट घेवून केली आहे.सिडकोचे व्यवस्थापक संचालक राजेश पाटील यांनी आतापर्यंत सिडकोच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. ग्रामीण भागातील अनेक रखडलेली कामे त्यांनी पुर्ततेस नेली आहेत. त्यामुळेच मौजे पारगाव डुंगी परिसरात जी आय ए अंतर्गत विकास कामांना सिडको कडून होत असलेला दिरंगाईबाबत त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सरपंच अहिल्या नाईक यांनी केली आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत व्यवस्थापक संचालक राजेश पाटील यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी जरे तसेच ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, माजी सरपंच सौ निशा रत्नदीप पाटील, माजी उपसरपंच सदस्य मनोज राम दळवे, माजी उपसरपंच सदस्य अंजली राहुल कांबळे, तसेच सदस्य शिल्पा नाईक आदी उपस्थित होते. यावेळी पारगाव गाव हे अल्ट्रा मॉडर्न गाव म्हणून बनवून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्या अंतर्गत येथील विकासकामे, गटारे, मलनिस्सारण, भूमीगत विद्युत वाहिन्या, पाण्याच्या लाईन तसेच विमानतळाच्या भरावामुळे पुर परस्थिती निर्माण होवू नये याकडे तातडीने लक्ष घालून उपाययोजना करावी. गावाकरिता क्रिंडागण म्हणून राखीव भूखंड ठेवावा यासह अनेक विकासकामे खोळंबली असून ती तातडीने पूर्णत्वास लावावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मागणीला सहकार्य करताना सिडको व्यवस्थापक संचालक राजेश पाटील यांनी या संदर्भात लक्ष घालून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून देण्याचे शिष्टमंडळाला हमी दिल्याने शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले आहेत.
थोडे नवीन जरा जुने