सन्मान कर्तुत्वाचा,सत्कार पनवेलच्या कन्यारत्नांचा


सन्मान कर्तुत्वाचा,सत्कार पनवेलच्या कन्यारत्नांचा
प्रितम म्हात्रे यांनी केला सत्कार!
         14 जून ते 17 जून 2023 दरम्यान कामाठी नागपूर येथे 19 वी युवा महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पनवेलच्या बॉक्सर मुलींनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले.


     कुमारी मधुरा पाटील ठाणा नाका रोड येथील रहिवाशी हिने 60 ते 63 वजन गटांमध्ये सुवर्णपदक आणि स्पर्धेतील सर्वात मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर चा पुरस्कार पटकावला तसेच 25 जून 2023 पासून होणाऱ्या भोपाळ येथील बी एफ आय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे 


. त्याबरोबरच कुमारी उन्नती परदेशी महाराणा प्रताप रोड परदेशी आळी येथील रहिवासी हिने 54 ते 57 वजन गटांमध्ये रौप्य पदक पटकावले . कुमारी योगिनी पाटील हिने 52 ते 54 वजन गटांमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे.


      आम्हाला अभिमान आहे तुमचा. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व पनवेलकरांच्या वतीने शुभेच्छा देत मा. विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे यांनी सत्कार केला.


थोडे नवीन जरा जुने