प्रभाकर कांबळे स्वगृही ना रामदासजी आठवले नि केली पनवेल महापालिका अध्यक्ष पदी नियुक्ती पनवेल प्रतिनिधी








प्रभाकर कांबळे स्वगृही ,ना. रामदासजी आठवले नि केली पनवेल महापालिका अध्यक्ष पदी नियुक्ती
पनवेल /प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते ,गेली तीस वर्षाहून अधिक काळ आंबेडकरी चळवळीत कार्य केलेले प्रभाकर शाबा कांबळे हे स्वगृही म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात परत आले असून नुकताच त्यांनी केंद्रीय मंत्री रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्तिथीमध्ये रिपाई मध्ये प्रवेश केला यावेळी पक्षाने त्यांच्यावर पनवेल शहर महानगरपालिका जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे .


गेली तीस वर्षाहून अधिक काळ आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करणारे नवीन पनवेल भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले प्रभाकर शाबा कांबळे हे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी निवडणुकीतीत दिलेले शब्द न पाळल्याने त्यांची ऐनवेळी महापालिका उमदेवारीचे तिकीट कापल्याने नाराज होऊन शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता . रिपाई पक्षाला राम राम केल्यानंतर त्यांनी केलेले नवीन पनवेल विभागातील काम, बहुजन चळवळ , दांडगा जनसंपर्क,हाडाचा कार्यकर्ता असल्याने त्यांना अनेक पक्षाकडून ऑफर होत्या मात्र मूळ नाळ आंबेकरी चळवळीची असल्याने त्यांनी समविचारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता



त्यावेळी त्यांच्या पत्नीला शेकाप कडून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी हि देण्यात आली होती त्या निवडणुकीमध्ये त्यांचा निसटता पराभव झाला मात्र तरीदेखील आपले काम अविरत सुरु ठेवणाऱ्या प्रभाकर कांबळे यांना शेतकरी कामगार पक्षामध्ये भवितव्य दिसत नसल्याने त्यांनी परत स्वगृही जाण्याचा निर्णय घेऊन रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश केला. आठवले साहेबांना कांबळे यांच्या कार्याचा आवाका ,त्यांचा जनसंपर्क ,चळवळीशी प्रामाणिकता पाहता त्यांच्यावर पनवेल महानगर पालिका जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ,
प्रभाकर कांबळे यांची पनवेल महानगर पालिका जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने आंबेडकरी चळवळीत जेष्ठ कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे .

थोडे नवीन जरा जुने