बनावट उत्पादनांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी नवीन पॅकेजिंग सादरबनावट उत्पादनांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी नवीन पॅकेजिंग सादर
 
पनवेल(प्रतिनिधी) गोदरेज अग्रोव्हेट लिमिटेडच्या (जीएव्हीएल) क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसने भारतीय शेतकर्‍यांना अधिक चांगले उत्पादन काढण्यासाठी सक्षम करणाऱ्या डबल या आपल्या बायोस्टिम्युलंटला २५ वर्षे पूर्ण झाल्याची आज घोषणा केली. डबलने गेल्या २५ वर्षात २ कोटी शेतकरी कुटुंबांचे जीवन समृद्ध करत ३ कोटी एकर भारतीय शेतजमिनीवर याचा वापर केला आहे.कंपनीने डबलच्या २५ वर्षांचे स्मरण करणारा आणि शेतकऱ्यांना बनावट उत्पादनांपासून संरक्षण देण्यासोबतच अधिक चांगल्या शेतीसाठीची बांधिलकी जपणारा सेलिब्रेटरी पॅक देखील सादर केला.डबल हे एक बायोस्टिम्युलंट, कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाला (टोमॅटो) पिकांमध्ये फुलं आणि फळांची गळती कमी करते. फुलं आणि फळे गळून पडणे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर १५%-२५% परिणाम होतो. डबलच्या योग्य डोससह बरोबर शेती पद्धतीशेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत करू शकते. डबलचा नवीन पॅक वापरकर्त्याना वापरायला सुलभ आणि सुरक्षित पॅकेजिंग बाटलीमध्ये आहे. यात कुणी भेसळ, बनावट करायचा प्रयत्न केल्यास लगेच कळेल असे टॅम्पर ईव्हीडंट सील आहे. त्यामुळे जेव्हा कोणी बाटली उघडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते सील फुटेल. बनावट भेसळ टाळण्यासाठी लेबलमध्ये जटिल वॉटरमार्क आहेतआणि अस्सलतेची खात्री करण्यासाठी प्रत्येकन प्रत्येक बाटलीवर एक विशिष्ट ९ अंकी कोड असलेला होलोग्राम आहे. उत्पादन अस्सल आहे याची ग्राहकांना खात्री देण्यासाठी होलोग्राममध्ये व्यवस्थितपणे एम्बेड केलेले अक्षर ‘जी’असून दृष्टीदोष असलेल्यांसाठी धोक्याची सूचना देणारे मार्किंग'ब्रेल' मध्ये आहे. 

थोडे नवीन जरा जुने