चित्रकला प्रकारात प्रथम पारितोषिक पनवेलच्या केविन डाइस यांना जाहीर
रायगड जिल्ह्यातील युवकांच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने केंद्र शासनाच्या कला, क्रीडा विभागामार्फत पनवेलमध्ये रविवार युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला, वक्तृत्व, कविता लेखन, मोबाईल फोटोग्राफी, समूह नृत्य, नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला प्रकारात प्रथम पारितोषिक पनवेलच्या केविन डाइस यांना जाहीर झाले. केविनने स्पर्धेत विकसित भारत हा विषय निवडला. आणि भारताचे चित्र केविनने रेखाटले. या चित्रकला स्पर्धेसाठी त्यांनी पेपर कटिंग्जसह मिश्र माध्यमांचा वापर केला होता.थोडे नवीन जरा जुने