कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.

उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या वतीने कुंडेगाव पागोटे नाका, पंप हाऊस, कुंडेगाव जवळ उरण येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महारक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, अन्नदानचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच उपक्रमांना जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. डॉ.प्रेम पाटील, सुरज हॉस्पीटलचे डॉ आर.एन. पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली.रक्तदानासाठी श्री साई ब्लड बँक सेंटरचे सहकार्य लाभले. तर रुग्णांचे नेत्र तपासणी वर्ल्ड ऑप्टीक्स मार्फत करण्यात आले. 


आरोग्य शिबीर,नेत्र तपासणी शिबीराचा, अन्नदानाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. रक्तदान शिबिरात एकूण 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शिवसेना उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत,सरपंच कुणाल पाटील,उपसरपंच सुजित तांडेल,शाखा प्रमुख महेंद्र पाटील, उपाशाखाप्रमुख महेश पाटील,खजिनदार -प्रदीप पाटील,सल्लागार रमेश पाटील, शिवसैनिक अरुण पाटील, कुमार मढवी, अविनाश म्हात्रे, मनीषा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही या सामाजिक संस्थेचे तोंड भरून कौतुक करत सर्वांचे आभार मानले. व असेच पुढे सामाजिक कार्य करत रहा व पुढे जा असा मौलिक सल्ला दिला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील,कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था, पागोटे या संस्थेचे अध्यक्ष सुमित चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष नकुल यशवंत पाटील,सचिव प्रणय रत्नकांत पाटील,सहसचिव - प्रथम कृष्णकांत तांडेल, खजिनदार सुरेंद्र पांडूरंग पाटील, कार्याध्यक्ष ऋषिकेश किशोर म्हात्रे,सदस्य-आकाश म्हात्रे, निखील तांडेल, सरदार राठोड, राहुल पाटील, प्रफुल्ल पवार, निनाद पाटील, पंकज पाटील, विशाल पाटील यांच्यासह शिवसेना शाखा - पागोटे, शिवसेना शाखा नवघर, शिवसेना शाखा - कुंडेगावच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.


थोडे नवीन जरा जुने