माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब या वेबसाईटचे लोकार्पण व शिवसेना गीताचा प्रकाशन


माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब या वेबसाईटचे लोकार्पण व शिवसेना गीताचा प्रकाशनउरण दि 2(विठ्ठल ममताबादे )
 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख व मा कार्यसम्राट आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त अवश्य साधून गुरुवार दिनांक 01 जून 2023 रोजी उरण तालुका संघटिका मनीषा नितीन ठाकूर व निष्ठावंत शिवसैनिक नितीन लक्ष्मण ठाकूर यांच्या सौजन्याने साहेब या वेबसाईटचे लोकार्पण तसेच त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले 
शिवसेना गीताचे प्रकाशन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. www.saaheb.co.in ही वेबसाईट सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय, क्रीडा, शासकीय माहिती व इतर माहिती देणारी वेबसाईट आहे तसेच 'शिवसेना हा धर्म आमचा शिवसेना हा प्राण आमचा' हे गीत देखील प्रकाशित करण्यात आले सदर गीत हे गायक महेश म्हात्रे(आवरे) यांनी गायलेले आहे तसेच या गीताचे गीतकार व संगीतकार श्रीकांत ठाकूर(धुतूम) आहेत.हे गीत स्वर म्युझिक स्टुडिओ, सोनारी येथे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. हे गीत उरण च्या राजकीय क्षेत्रात निश्चित धूमधडाका उडवील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर,उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, शिवधन पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, जेष्ठ कार्यकर्ते मनोज पाटील, द्रोनागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष हुसेना शेख, 
नवीन शेवा सरपंच सोनल घरत, कामगार नेते गणेश घरत, दयाळ भोईर, दिनेश घरत, युवानेते दीपक भोईर, धुतूम गावचे ज्येष्ठ शिवसैनिक सज्जन ठाकूर, नवीन शेवा शाखाप्रमुख शैलेश भोईर, शाखा संघटिका वैशाली सुतार, ग्रामपंचायत सदस्य वैशाली म्हात्रे, मयुरी घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने