काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २ जून, गेले आठ महिने खड्तर प्रवास करीत असताना,पावसाची चाहूल लागली की प्रत्येक मेंढपाळ आपल्या मायभूमी कडे प्रस्थान करीत असतात.कारण घाटमाथ्यावर चार महिने या मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो.परंतु पाऊस शांत झाला की पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला लावा -जवा घेवून कोकणात येत असतात.
साधारण दिवाळी या सणामध्ये या मेंढपाळांचे कोकणात आगमन होत असते.पावसाळ्यात विविध प्रकारची काटेरी वनस्पती निर्माण होत असते.यामुळे त्यांच्या चा-यांचा प्रश्न मार्गी लागत असतो.कोकणात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे ऑक्टोबर-नोव्हेंबर ते मे -जून दरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे २५० ते ३०० किलोमीटर मेंढपाळांना चार्यासाठी भटकंती करावी लागत असते.
दरम्यान, पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होत असल्यामुळे मेंढपाळ मेंढय़ांचा कळप घेऊन आपल्या घरी परतीची वाट धरू लागले आहे.पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो.
Tags
पाताळगंगा