उरण दि 1(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर व नवीन शेवा गावातील सामाजिक कार्यकर्ते दयाळशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन
करण्याच्या दृष्टीकोनातून मनोहर भोईर सामाजिक संस्था व हिंदूरक्षक मित्र मंडळ नविन शेवा यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील नविन शेवा गावातील स्मशान भूमी येथे वृक्षारोपण करून वाढदिवसा निमित्त पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
ओसाड व नापिक व उकिरडा असलेल्या जमिनीवर नारळ, सुपारी, करंज, कडुलिंब आदी वृक्ष लावण्यात आले. नापिक, उकिरडा असलेल्या जमीनीत झाडे लावून उकिरड्याचे नंदनवन करण्याचा संकल्प पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे. वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा,निसर्ग रक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्था व हिंदू रक्षक मित्र मंडळच्या पदाधिकारी, सदस्यांनी दिला आहे.यावेळी दयाळशेठ भोईर, जगजीवन भोईर,गणेश घरत,दिपक भोईर, दिनेश घरत, गणेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.
Tags
उरण