उरणमध्ये मोफत अभिनय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद.







उरणमध्ये मोफत अभिनय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद.

 उरण दि 1( विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2023 ते 6 जून 2023 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह,



 तेलीपाडा, उरण येथे अमित भगत मित्र मंडळ यांच्या वतीने वयोगट 7 ते 16 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या अभिनय कार्यशाळेचे आज दि 1 जून रोजी उदघाटन करण्यात आले.या अभिनय कार्यशाळेत नाट्य व कास्टींग डायरेक्टर संकेत ओक, अभिनेता दिग्दर्शक मयुर जयसिंग, फुलपाखरू फेम अभिनेता निलय घैसास,लेखिका निवेदिका - वृंदा दाभोलकर यांचे उत्तम अशा मार्गदर्शन लाभणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत मोठया प्रमाणात सहभाग घेतला.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, संकेत ओक ( एनएसडी मास्टर - वेध अकॅडेमि डायरेक्टर )



महादेव घरत, संतोष ठाकुर, मनिषा ठाकुर, हीना कोळी,सुप्रिया कोळी,मानसी पुरो,रोहीदास म्हात्रे,राजू पाटील,दिनेश भगत, सचिन वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन- अमित भगत यांनी केले. यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी एका चांगल्या व स्तुत्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आयोजक अमित भगत मित्र मंडळाचे कौतुक करत आभार मानले.


6 जून 2023 पर्यंत हि कार्यशाळा सुरु राहणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच तथा आयोजक अमित भगत यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने