पनवेल एसटी आगारात दोन मोबाईल टॉयलेट पुरविणेबाबत माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांचे आयुक्तांना निवेदन








पनवेल एसटी आगारात दोन मोबाईल टॉयलेट पुरविणेबाबत माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांचे आयुक्तांना निवेदन*
पनवेल दि.२१ (संजय कदम) : पनवेल एस. टी. आगाराचे पूर्वबाजूस टॉयलेटची सोय नसल्याने त्या ठिकाणी दोन मोबाईल टॉयलेट (सुलभ शौचालय) पुरवण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक व प्रवासी वाहतूक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज भुजबळ यांनी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.



             या निवेदनात मनोज भुजबळ यांनी म्हटले आहे कि, पनवेल एसटी आगारांत प्रवाशांसाठी पश्चिमेस एकमेव टॉयलेट आहे, परंतु पूर्व बाजूस एसटी प्रवाशांसाठी टॉयलेटची सोय नसल्याने प्रवासी उघडयावर विधी करत असतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे.



 नुकतेच प्रवासी वाहतूक सामाजिक संस्थेमार्फत पनवेल महानगरपालिकेचे ५० स्वच्छतादूत व आमच्या संघटनेचे पदाधिकारी यांनी पनवेल आगारांतील परिसर स्वच्छतेची मोहिम हाती घेतली होती. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर हजर होते. आगारांच्या पूर्व बाजूस प्रवाशांच्या सोईसाठी टॉयलेटची सोय नसल्याने प्रवाशांच्या गैरसोई बाबत त्यांनीही नाराजी व्यक्त केली. 



यावर निधी उपलब्ध नसल्याने आगाराचे पूर्व बाजूस स्वतंत्रपणे टॉयलेटची सोय करता येत नसल्याचे आगार प्रमुखांनी सांगितले. याचा विचार करून प्रवाशांच्या सोईसाठी पुरुषांसाठी १ व महिलांसाठी १ अशा प्रकारे २ मोबाइल टॉयलेटची (मुलभ शौचालय) व्यवस्था महानगर पालिकेकडून करणेत यावी अशी मागणी मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. दरम्यान या निवेदनाची एक प्रत मनोज भुजबळ यांनी कार्यवाहीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे दिली आहे.

  

थोडे नवीन जरा जुने