खारघर दुर्घटनेच्या अहवालासाठी समितीने मागितली मुदतवाढ
खारघर दुर्घटनेच्या अहवालासाठी समितीने मागितली मुदतवाढ

खारघर दुर्घटना प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी समितीने एक महिन्याची मुदत मागितली आहे. 16 एप्रिल रोजी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने 20 एप्रिल रोजी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली होती आणि त्यांना एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते.खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या एकल सदस्यीय समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही. अतिरिक्त मुख्य सचिव ((महसूल) नितीन करीर यांच्या नेतृत्वाखालील समितीने आता अहवालासाठी एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे.
 खारघर दुर्घटनेनंतर, राज्य सरकारने 21 एप्रिल रोजी या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि महिनाभरात अहवाल सादर करण्याची घोषणा केली होती, मात्र आता या समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी महिनाभराची मुदत मागितली आहे.


थोडे नवीन जरा जुने