शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील यांचे पोलिस संरक्षण पुर्ववत करण्याची शिवसेनेची मागणी






शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील यांचे पोलिस संरक्षण पुर्ववत करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल दि.१७(वार्ताहर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्क प्रमुख व महाविकास आघाडी पनवेल उरणचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांचे पोलिस संरक्षण पुर्ववत करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उप आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.



शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा महाविकास आघाडी पनवेल उरणचे अध्यक्ष बबनदादा पाटील हे गेली अनेक वर्ष विविध सामाजिक कार्य, शिवसेना पक्षातर्फे जनहिताची विविध आंदोलने तसेच प्रकल्पग्रस्तांच्या महत्वाच्या मुद्दयांबाबतची आंदोलन करण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. या सर्व आंदोलने तसेच कार्या दरम्यान विविध समाज विघातक व्यक्तींशी त्यांनी समाज हितासाठी वैर पत्कारलेले आहे. काही दशकापूर्वी इतर धर्मीय प्रार्थना स्थळाचे काम बंद पाडल्यामुळे स्वर्गीय आनंद दिघे व बबनदादा पाटील यांस जीवे मारण्याची धमकी ही इतर धर्मीयाकडून देण्यात आली होती.


 बबनदादा पाटील हे ठाकरे कुटूंबियांच्या अत्यंत जवळचे असून ते कर्जत येथे आले असता त्यांच्या सर्व देखभाली तथा प्रवासाचे नियोजन हे त्यांच्याकडे असते. तरी या बाबींचा विचार करून बबनदादा पाटील यांना शासनामार्फत पोलिस सुरक्षा देण्यात आली होती मात्र ती आता कोणत्याही कारणाशिवाय तडकाफडकी काढण्यात आलेली आहे. बबनदादा पाटील यांस नुकतेच काही समाज कटंकाकडून निवास हानी पोहोचविण्याची धमकी देण्यात आलेली असून त्या संदर्भातील तक्रार पोलिस दप्तरी नोंदविण्यात आलेली आहे.


 मात्र नुकतेच काढण्यात आलेल्या पोलिस सुरक्षेनंतर त्यांच्या जिवाला असलेला धोका हा वाढला असून समाज कंटकांमार्फत भविष्यात त्यांच्या जिवीताला धोका उध्दभवू शकतो. तसेच ते सोबत असता त्यांचे कुटूंबिय व आप्तेष्ट यांनाही वैमान्यस्यातून इजा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता बबनदादा पाटील यांचे काढून घेतलेले पोलिस सुरक्षा पूर्ववत करावी अशी मागणी तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी केली आहे.



थोडे नवीन जरा जुने