पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीपर शॉर्ट फिल्मचा शुभारंभ







पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीपर शॉर्ट फिल्मचा शुभारंभ

पनवेल महापालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीपर शॉर्ट फिल्म व गाण्याच्या शुटिंगचा शुभारंभ आज कळंबोली येथे श्रीफळ वाढवून आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.



यावेळी उपायुक्त सचिन पवार, पर्यावरण विभाग उपायुक्त कैलास गावडे, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, दिग्दर्शक सागर आंगणे, प्रमुख कलाकार अभिनेता गश्मिर महाजनी, अभिनेत्री कुंजिका काळविट, बालकलाकार स्वराज सोसे, आदि मान्यवर उपस्थित होते.



पनवेल महापालिकेच्यावतीने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहिम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून अँण्ड फ्रॉफीट अँडव्हरटायझिंग या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत जनजागृतीपर एक शॉर्ट फिल्म व एक गाणे तयार करण्यात येणार आहे. याच्या शुटिंगचे शुभारंभ आज कळंबोली येथे आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. माझी वसुंधरा 3. 0अंतर्गत पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे... त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे पर्यावरणपुरक गणोत्सव, मागील वर्षीही महनगरपालिकेने पर्यावरणपुरक गणोत्सव स्पर्धा आयोजित केली होती.. यावर्षी महानगरपालिकेने पर्यावरणपुरक गणोत्सव साजरा करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.



पर्यावरणपुरक गणोत्सव साजरा करताना शाडूच्या मातीचा गणपती असणे, कृत्रिम तलावांमध्ये मुर्तीचे विसर्जन, मुर्ती दान अशा विविध उपाय योजना करणे महत्त्वाचे ठरते. याच पर्यावरणपुरक गणोशोत्सवाचा संदेश नागरिकांमध्ये पोहचणे गरजेचे आहे. याच उद्देशाने महानगरपालिकेने जनजागृती करण्यासाठी प्रसिध्द अभिनेता गश्मिर महाजनी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कुंजिका काळचिंट यांना घेऊन एक शॉर्ट फिल्म व गाणे प्रसिध्द करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्यावतीने तयार करण्यात येणारी शार्ट फिल्म व गाणे महापालिकेच्या फेसबुक, टिव्टर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमातून तसेच इतर समाज माध्यमातून प्रसारीत करण्यात येणार आहे..


थोडे नवीन जरा जुने