उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज, भूमिपुत्रांचे कैवारी, 1984 च्या उरणच्या शेतकरी आंदोलनाचे प्रणेते, सर्वसामान्य जनतेचे कल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त
शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या पनवेल येथील संग्राम या बंगल्यावर जाऊन लोकनेते दि बा पाटील साहेब यांना उरण मतदार संघातील प्रकल्पग्रस्त जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी स्वर्गीय दि बा पाटील साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील हेही उपस्थित होते. सदर वेळी स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला व त्यांच्याबद्दल माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वर्गीय पाटील साहेबांबद्दल असलेला आदर व त्याने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Tags
उरण