कै. वीर वाजेकरशेठ यांच्या 116 व्या जयंतीचे आयोजन.


कै. वीर वाजेकरशेठ यांच्या 116 व्या जयंतीचे आयोजन.
उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे ) उरणचे भाग्य विधाते, गोरगरिबांचे दैवत कै.वीर वाजेकरशेठ यांचे प्रकल्पग्रस्त, कामगार,शेतकरी, भूमीपुत्र यांच्यासाठी मोठे योगदान आहे. उरणचा इतिहास वीर वाजेकरशेठ यांच्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही.


प्रकल्पग्रस्त भूमीपूत्रांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवनच अर्पण केले असे स्वर्गीय वीर वाजेकरशेठ यांची 116 वी जयंती गुरुवार दि 6 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता उरण पेठा मिठागर संघ कार्यालय कोटनाका, उरण शहर, तालुका उरण जि - रायगड येथे साजरी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ मान्यवर, चेअरमन, संचालक सभासद यांच्या उपस्थितीत हा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे


.तरी सर्व नागरिकांनी उरण पेठा मिठागर संघ युनियन ऑफिस कोटनाका उरण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उरण पेठा मिठागर कामगार संघ, उरण पेठा मीठ उत्पादक सहकारी संस्था,उरण महल सहकारी मजूर संघ तर्फे करण्यात आले आहे.थोडे नवीन जरा जुने