सिंघम गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांनी अँगल चोरी करणार्‍या गुन्हेगारास केली अटकसिंघम गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांनी अँगल चोरी करणार्‍या गुन्हेगारास केली अटक
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः पनवेल जवळ नव्याने उभारत येत असलेल्या नवी मुंबई एअर पोर्टच्या ठिकाणी लाखो रुपये किंमतीचे अँगल चोरणार्‍या गुन्हेगारास नुकतेच गुन्हे शाखा कक्ष 2 या विभागात दाखल झालेले सिंघम सुनील गिरी यांनी गुप्त बातमीदाराद्वारे सदर आरोपीला ताब्यात घेेतले आहे.
पनवेल जवळ नव्याने उभारत येत असलेल्या नवी मुंबई एअर पोर्टच्या ठिकाणी आरोपी मितेश शेट्टी याने जवळपास सव्वा चार लाख रुपये किंमतीचे अँगल चोरुन तो पसार झाला होेता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्यासंंदर्भात गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदशर्र्नाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी हे तपास करीत असताना त्यांना सदर आरोपीची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी, पोलीस हवालदार सचिन पवार, पोे.हवा.इंंद्रजीत कानू आदींनी पनवेल जवळील तरघर येथे सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेेतले व पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. व पुढील तपासाकरिता पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
सुनील गिरी यांनी नुकताच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल येथे पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कामगिरीची चुणूक दाखविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


थोडे नवीन जरा जुने