पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे ची मागणी





पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे ची मागणी
पनवेल दि.१७(वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेमध्ये नोकरभरती सुरु आहे. या मध्ये सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची मागणी शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे. 



      सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाची कोणत्याही प्रकारची पुर्तता केलेली नाही. सिडको हद्दीतील सर्व गावे पनवेल महानगरपालिकेत सामाविष्ट आहेत. प्रकल्पग्रस्तांची शेती सिडकोने हिसकाऊन घेवून प्रकल्पग्रस्त नागरीकांना सिडकोने वा-यावर सोडलेले आहे. त्यांचे विकासाचे कोणतेही काम आजतगायत केलेले नाही. सिडकोची विकासगंगा नोकरीची हमी आमच्या डोळयांनी आम्ही कधीही बघितलेली नाही. दरम्यान पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त नागरीकांना व स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे व कोविड- १९ मुळे गेलेली २ वर्षाची वयाची अट सुध्दा वाढवून दयावी. तसेच पनवेल महानगरपालिकेचे नांव स्थानिकांना रोजगार देते म्हणून राज्यात नाव लौकीक करावे अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे, राजेश मोहिते उपस्थित होते. 



थोडे नवीन जरा जुने