स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे यासाठी डिपी वर्ल्ड सेझ कंपनी विरोधात अजित म्हात्रे करणार आमरण उपोषण.


स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे यासाठी डिपी वर्ल्ड सेझ कंपनी विरोधात अजित म्हात्रे करणार आमरण उपोषण.


उरण दि. 18 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यात जेएनपीटी (जे.एन.पी.ए )प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेता,नोकरीत प्राधान्य न देता, डिपी वर्ल्ड सेझ कंपनीने परप्रांतीयांची भरती केल्याचे बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. परप्रांतीयांची भरती केल्यामुळे स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे डीपी वर्ल्ड सेझ कंपनीत स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावे,नोकरी मध्ये स्थानिक भूमीपुत्रांना, प्रकल्पस्तांना प्राधान्य मिळावे या प्रमुख मागणीसाठी उरणमधील युवा सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी परप्रांतीयांची भरती केल्याबाबत निषेध व्यक्त करत, स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दया.अगोदर नोकरीत सामावून घ्या.अन्यथा डिपी वर्ल्ड सेझ कार्यालया समोर दिनांक 25 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून डीपी वर्ल्ड सेझ कंपनी प्रशासन विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा डीपी वर्ल्ड सेझ कंपनी प्रशासनाला युवा सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी दिला आहे.डी पी वर्ल्ड सेझ या कंपनीने स्थानिक लोकांच्या शेकडो एकर जमिनी संपादित करून तिथे आपले पाय रोवले. यानंतर सदर कंपनीमध्ये परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात भरती चालू केलेली आहे. सदर भरती ही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून केल्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या घटनेची माहीती बेलपाडा गावचे समाजसेवक अजित कृष्णा म्हात्रे यांना दिली असता समाजसेवक अजित म्हात्रे यांनी स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याकरता कंपनीसोबत अनेकदा याबाबत पत्र व्यवहार केला परंतु कंपनीने आपला मनमानी कारभार चालू ठेवून डी पी वर्ल्ड सेझ या कंपनीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची भरती केल्याचे अजित म्हात्रे यांचे निदर्शनास येताच त्यांनी याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना भरती करिता प्राधान्य दिले नाही तर दिनांक 25/7/2023 रोजी डी पी वर्ल्ड सेझ या कंपनीसमोर अजित म्हात्रे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रव्यवहाराद्वारे भारत पारीख (प्रमुख औद्योगिक संबंध )यांना दिलेला आहे.


थोडे नवीन जरा जुने