कामगारांच्या विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघातर्फे हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला मोर्चा.

कामगारांच्या विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघातर्फे हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला मोर्चा.
सरकारला विचारणार जाब.उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश, विदर्भ प्रदेश आणि गोवा या तीन प्रांताची बैठक उरण तालुक्यातील जे एन. पी टी मध्ये दि 8 जुलै 2023 पासून सुरु झाली आहे.ही बैठक दोन दिवसीय असून या बैठकीस भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री रवींद हिमते, केंद्रिय उपाध्यक्षा निता चोबे, क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश, अखिल भारतीय पोर्ट ट्रस्ट प्रभारी अण्णा धुमाळ व तीनही प्रांताचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी, संघटन मंत्री, कोषाध्यक्ष व केंद्रीय फेडरेशन चे प्रभारी उपस्थित होते
 . सुरवातीस भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हा व जे. एन. पी. टी कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन सत्रात अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिमते यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात संघ प्रचारक सुमत आमसेकर यांचे मार्गदर्शन झाले. 
या बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या तिन्ही प्रांताच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे तसेच पुढील कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय पोर्ट डॉक मजदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील व क्षेत्रीय संघटन मंत्री सी.व्ही.राजेश यांनी दिली. बैठक यशस्वी करण्यासाठी जे एन पी टी मधील संघटनेचे सुरेश पाटील, सुधीर घरत, रवी पाटील, जनार्दन बंडा , जितेंद्र घरत, दिनेश साखरे, मंगेश पवार, केसरीनाथ म्हात्रे, नारायण धुमाळ, राजू म्हात्रे रायगड जिल्हा ज्येष्ठ पदाधिकारी रमेश गोविलकर यांनी परिश्रम घेतले.या बैठकीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला भारतीय मजदूर संघातर्फे विशाल अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुरेश पाटील यांनी यावेळी दिली.


थोडे नवीन जरा जुने