करंजाडे डॉक्टर्स असोशिएशन तर्फे वृक्षारोपण.

करंजाडे डॉक्टर्स असोशिएशन तर्फे वृक्षारोपण.

 उरण दि 2 (विठ्ठल ममताबादे ) निसर्गाचे,पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, पर्यावरण संरक्षणा विषयी समाजात जणजागृती व्हावी या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील करंजाडे डॉक्टर्स असोशिएशन तर्फे रविवार दि 2 जुलै 2023 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत साईतिर्थ प्रतिष्ठाण, सेक्टर 4, करंजाडे, टाटा पॉवर हाउसच्या मागे,करंजाडे पाईपलाईनजवळ पनवेल येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.सदर वृक्षारोपण कार्यक्रम करंजाडे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विक्रम पाटील व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पर्यावरणाची होणारी हानी व धोक्यात आलेले सजीव सृष्टी, धोक्यात आलेले सृष्टीचक्र लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत सर्व डॉक्टरांनी एकत्र येत यावेळी वृक्षारोपण केले.सर्वप्रथम सर्व डॉक्टरांच्या हस्ते श्री साईबाबांची आरती करण्यात आली. डॉ. विक्रम पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत वृक्षारोपण करणे किती महत्वाचे आहे हे सांगितले , डॉ. डी. व्ही जगदाळे,ज्वालासिंह देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.करंजाडेचे उपसरपंच सागरभाई आंग्रे

,डॉ. सागर पाटील,डॉ. सुनिल गरुडे, डॉ कृष्णा चव्हाण,डॉ.अलका सलगर, डॉ रणजित माळी,डॉ. समीर पावशे, डॉ. आर. जी.पाटील,डॉ. जेबा पॉलिसार, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. अमोल बामणे, डॉ. बालू हरगावकर, डॉ. आकाश, अवधूत, डॉ. मिनल जायभाये, डॉ. शशांक तारी ,डॉ. अरविंद कुदळे,डॉ.सुजित पवार, डॉ. आतिष कदम,विलास ढाके, रियांका बने, स्वराज्य संघटनेचे करंजाडे उपाध्यक्ष शुभम धरेराव तसेच बच्चे कंपनी मध्ये प्रत्यूषा सलगर, स्वरांजली जायभाये, विहान पाटील, स्वरांजली पाटील , रिषा माळी, अनिकेत बेल्हेकर , समाधान लवटे आदी मान्यवरांनी वृक्षा रोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पांडूरंग सलगर यानी सर्वांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने