नवनियुक्त पोलीस निरीक्षक सतीश निकम यांचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत.


नवनियुक्त पोलीस निरीक्षक सतीश निकम यांचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत.

उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )उरण पोलीस स्टेशनला नव्यानेच पदभार स्विकारलेले उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांचे उरण पोलीस स्टेशनला जावुन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.व विविध विषयावर पदाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.यावेळी उरण तालुका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष तुकाराम खंडागळे, भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका अध्यक्ष अमोल शेजवळ , उरण शहर प्रमुख मुजमील तुगेंकर, उरण संस्कार उपाध्यक्ष सदानंद सकपाळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडी तालुका उरण,भारतीय बौद्ध महासभा तालुका उरण तर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


थोडे नवीन जरा जुने