कै. कू. अमित रामकृष्ण पालकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप व अन्नदान
कै. कू. अमित रामकृष्ण पालकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य वाटप व अन्नदान 

उरण दि २(विठ्ठल ममताबादे )कै. कू. अमित रामकृष्ण पालकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कू. दुर्वा अमोघ पालकर आणि बिग बॉस ग्रुप वेश्वी यांच्या तर्फे सलग आठव्या वर्षी उरण तालुक्यातील रा. जि. प. प्रा.शाळा वेश्वि येथे १५० विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.तसेच उरण तालुक्यातील वेश्वि कातकरीवाडी येथील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. सायंकाळी पनवेल तालुक्यातील करुणेश्वर वृध्दाश्रम भानघर येथे अन्नदान करण्यात आले.सदर कार्यक्रमास स्वर्गीय अमित पालकर यांचे बंधू अमोघ पालकर, कैलास पालकर, महेश पालकर, शरद पालकर तसेच बिग बॉस ग्रुप चे अक्षय पाटील, स्नेहल पालकर, नितेश मुंबईकर, कल्पेश पाटील, राकेश पाटील, सुमित पाटील, प्रणित कडू, विपुल मढवी, रोशन पाटील, परम पाटील, अतुल पाटील, तेजस पाटील, वैभव पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने