पनवेल दि.२६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील विचुंबे जवळील मुंबई पुणे एक्सप्रेसवर फॉर्च्युनर कार पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या २४ तासापासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील पहिल्या लेन वरती पाणी साचले होते. फॉर्च्युनर कारवरील चालक विरेश हिरेमठ (वय 30, रा.सांगली) हा इतर दोन प्रवाश्यांसह मुंबई ते सांगली असा प्रवास करत असताना त्यांची गाडी विचुंबे जवळ आली असता त्यांनी त्यांच्या कारचा ब्रेक मारल्याने वाहनावरील त्यांचे नियंत्रण सुटून कार घसरली आणि उजव्या बाजूचे रेलिंग तोडून कार मध्यभागी असलेल्या बगीचामध्ये जाऊन पलटी झालेली आहे. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. सदर वाहन आयआरबी कडील क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
Tags
पनवेल