अग्नीशस्त्र जवळ बाळगणाऱ्या इसमाला तळोजा पोलिसांनी केली अटक

अग्नीशस्त्र जवळ बाळगणाऱ्या इसमाला तळोजा पोलिसांनी केली अटक
पनवेल दि.२७ (संजय कदम) : कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसतांना पिस्टल जवळ बाळगणाऱ्या इसमाला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. शाहरूख अब्दुल मजीद खान असे या अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. 


                    नवी मुंबई परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घातक शस्त्रे बाळगण्यास मनाईचा आदेश पारित केलेला आहे. मुंब्रा येथील रहिवाशी आरोपी शाहरूख अब्दुल मजीद खान हा अधिकृत परवाना नसतांना पिस्टल जवळ बाळगत असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नावडे फाटा जवळील चंद्रविलास लॉज येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून पोलिसांनी लोखंडी धातुचे एक अग्नीशस्त्र व १ जिवंत काडतुस, रोख रक्कम व इतर कागदपत्रे जप्त केले आहे.


थोडे नवीन जरा जुने