पनवेल दि.२० (संजय कदम) : अतिवृष्टीमुळे खालापूर येथील इर्शाळगड पायथ्याशी मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. इर्शाळवाडीवर मोठी दरड कोसळून अनेकजण मृत्यूमुखी पडले आहे. या दुर्घटनेत काही नागरिक सुखरूप वाचले असून काही अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. यावेळी जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी एमजीएम रुग्णालयात कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी जखमींची रूग्णालयात भेट घेतली तसेच डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी त्यांचे नातेवाईक तिथे उपस्थित होते त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
सोबत उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपमहानगर संघटक सूनित पाटील, शहर प्रमुख यतीन देशमुख, प्रवीण जाधव, सूर्यकांत म्हसकर, शहर संघटक संतोष गोळे, राकेश टेमघरे उपशहर प्रमुख दिपक पाटील, विभाग प्रमुख बबन गोगावले, ॲड. अमर पटवर्धन, महिला आघाडी विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ, उपमहानगर संघटीका सौ. संचित राणे, शहर संघटीका सौ. संगीता राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल