रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अधपनवेल पदी रो.रतन खरोल यांची निवडरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अधपनवेल पदी रो.रतन खरोल यांची निवड
पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला रोटरी प्रांत 3131 चे सन 2025-26चे नियोजित प्रांतपाल रो. संतोष मराठे, आखील भारतीय खरोल समाजचे अध्यक्ष नंदलालजी खरोल, माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, सह प्रांतपाल कमलेश अग्रवाल यांच्या प्रमूख उपस्थितीत 22-23 चे यशस्वी मावळते अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आपली धुरा सन 23-24 चे नवनिर्वाचित अध्यक्ष रतन खरोल यांच्या हाती सुपूर्द केली तर सचिव अनिल ठकेकर यांनी आपली धुरा अनिल खांडेकर यांच्या हाती दिली. सदर समारंभात नविन संचालक मंडळाच्या सदस्यांना रोटरी पीन व मानाची राजस्थानी टोपी देऊन गौरविण्यात आले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी रोटरी प्रांत 3131 मध्ये 22-23 प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष लक्ष्मण पाटील व सहकाऱ्यांचा भरभरून कौतुक केले व नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
सदर समारंभासाठी मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी सभापती काशीनाथ पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेवक ऍड. प्रथमेश सोमण, अंथनी गॅरेज चे गौरव त्रिवेदी, असाई ग्लास चे प्रशांत माशेलकर, रोटरी ग्रामसभा वाकडीचे अध्यक्ष वैभव गायकवाड, वनवासी कल्याण आश्रमशाळा चे सतिश गुणे, मोहन मुजुमदार,शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. कापसे, प्रकाश पाटील, योगेश महाजन, डॉक्टर संतोष जाधव, मुनाभाई चौधरी आदी मान्यवरांसह इतर क्लबचे अध्यक्ष,रोटरी सदस्य, ऍनस, अनेटस, रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने