एक सही संतापाची






महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर प्रभाग क्र. १९ चे विभाग अध्यक्ष संदीप पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अनिमेश ओझे, सचिन सिलकर व आकाश घाटे, आकाश दलाल यांचे तर्फे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घटनांबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी *एक सही संतापाची* या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 




सदर उपक्रमात अनेक नागरिकानी सह्या करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी रायगड जिल्हा सचिव अतुल चव्हाण,पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले,विद्यार्थी सेना जिल्हा सचिव अक्षय जोशी, तालुका सचिव आकाश गाडे, वाहतूक सेना चिटणीस सचिन जाधव,महाराष्ट्रसैनिक मंदार पाटणकर, गणेश गायकर, केदार सोमण, रुपेश शेटे, केदार रेवाळे, अभि रिंगे, शुभम म्हात्रे, संचित मोरे,अक्षय जैतपाल तसेच प्रभागातील महाराष्ट्रसैनिक व नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सह्याच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.


थोडे नवीन जरा जुने