कंपनीमध्ये घरफोडी करणाऱ्या ४ आरोपींना मुद्देमालासह तालुका पोलिसांनी केली अटक







कंपनीमध्ये घरफोडी करणाऱ्या ४ आरोपींना मुद्देमालासह तालुका पोलिसांनी केली अटक पनवेल दि.१०(संजय कदम): पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये घरफोडी करून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल पळवणाऱ्या ४ जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घरफोडीतील काही ऐवज हस्तगत केला आहे. या गुन्ह्यामध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सुद्धा समावेश आहे.

पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कंपाउंडच्या लोखंडी जाळ्या उचकटून अज्ञात चोरटयांनी गोडाऊनमध्ये प्रवेश करून बांधकासाठी करण्यात येणारे एकूण ४२ डोकाबिम ज्याची किंमत जवळपास लाखो रुपये आहे. ती चोरून नेण्यात आले होते. या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहा पोलीस निरीक्षक संजय गळवे, पो हवा महेश धुमाळ, पो हवा सुनील कुदळे,






पोशी आकाश भगत, पोशी तुकाराम भोये आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी अनिल कातकरी, सोमनाथ पवार, शेखर वाघमारे, व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी सदर घरफोडी करून ते आदिवासीवादी येथे लपल्याची माहिती या पथकाला मिळाली त्यानुसार या पथकाने सदर चारही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जवळपास ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक संजय गळवे करीत आहेत  




थोडे नवीन जरा जुने