पूरग्रस्त चिरनेरला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट








पूरग्रस्त चिरनेरला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट


उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )4 ते 5 दिवसा पासून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावे पाण्या खाली गेली होती. अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते चिरनेर गावातील परिस्थिती अतिशय चिंताजनक होती. चिरनेर गावा मध्ये डोंगरावरून येणारे पाणी गावात घुसल्यामुळे व पाण्याचा प्रचंड वेग असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झालेले आहे


. एक-दोन ठिकाणी घरांच्या भिंती पडलेल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेला आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी चिरनेर मध्ये येऊन येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून संपूर्ण गावात फेरफटका मारला या पुरामुळे ज्या ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला


.तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांना फोन करून नुकसानग्रस्तांचे पंचनामे त्वरित करायला सांगितले आहेत व लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी आणि महत्वाचे म्हणजे कायमस्वरूपी गावामध्ये पूर होऊ नये यासाठी पूर्वनियोजित मोऱ्या चालू कराव्या यासाठी प्रयत्न करावेत लोकांना वेळेत मदत मिळावी यासाठी मी स्वतः यासंदर्भात पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले. या संकटाच्यावेळी आम्हीं सर्वजण तुमच्या सोबत आहोत असे त्यांनी नुकसानग्रस्तांना आश्वासित केले: व धीर दिला यावेळी चिरनेर ग्रामस्थांनी महेंद्रशेठ घरत यांच्याशी बोलताना जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या बद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करून साहेब आपण या चिरनेर गावावर खूप प्रेम करत आहेत आपण आमदार, खासदार नसतानाही कोरोनामध्ये गरजेवेळी ॲम्बुलन्स दिली, 


अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार दिलात धार्मिक मंदिरांना आर्थिक सहाय्य केलं अनेक धार्मिक कार्यामध्ये, सुखदुःखामध्ये कला,क्रीडाच्या कार्यक्रमांमध्ये आपण नेहमी सहकार्य करत आहात म्हणून आपणाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण कराल असे ग्रामस्थांनी यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. 



यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष किरिट पाटील, कोकण फिशरमन अध्यक्ष मार्तंड नाखवा, अलंकार परदेशी, बी.एम.ठाकूर, घनश्याम पाटील, रायगड जिल्हा युवक व क्रीडा सेल चे अध्यक्ष आदित्य घरत, उरण विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष लंकेश ठाकूर,उरण तालुका इंटकचे उपाध्यक्ष राजेश ठाकूर, रायगड जिल्हा युवक इंटक चे उपाध्यक्ष अंगत ठाकूर, उरण विधानसभा युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, विवेकानंद म्हात्रे,बी.सी.ठाकूर,किरण कुंभार, सचिन घबाडी, आनंद ठाकूर, राजू जाधव व काँग्रेस कार्यकर्ते व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने