ईरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाने वाहिली श्रद्धांजली

ईरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाने वाहिली श्रद्धांजली
पनवेल दि.२१ (संजय कदम) : खालापूर तालुक्यातील ईरशाळवाडी येथे दरड कोसळून सुमारे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही जण हे जखमी झालेले आहेत. मृत झालेल्या सर्व बांधवांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे . पक्षाचे पक्षप्रमुख सागर संसारे , युवा नेते अनिकेत संसारे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दुःख व्यक्त केले आहे.                   यावेळी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या सर्व मृत्यू झालेल्या व्यक्तींना त्याचबरोबर जखमी परिवारांना योग्य ती शासकीय मदत करण्यात यावी. तसेच त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा अतिदुर्गम भागामध्ये लोकवस्ती असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने कमीत कमी जाण्या येण्याचा रस्ता तयार करावा . संपूर्ण कोकणांमधल्या आदिवासी वाड्या यांचा सर्वे करून त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रस्त्याची निर्मिती करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे कोणतीही दुर्घटना घडली तर तेथे मदत पोचवणे शक्य होईल अशी मागणी महेश साळुंखे यांनी केली आहे.थोडे नवीन जरा जुने