पनवेलमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन


पनवेलमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

पनवेल: प्रतिनिधी
          काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची याचिका गुजरात न्यायालयाने फेटाळली असून खासदारकी रद्द करत त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केल्याचा आरोप करीत याविरोधात आज (रविवार दि.९ जुलै) पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वात पनवेलमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.          कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत परतण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी मोदी आडनावाच्या टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती नाकारली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप सरकारच्या दबावाखाली गुजरातमध्ये मानहानीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे. याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी काँग्रेस आक्रमक होताना दिसून येत आहे. पनवेलमध्येही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून राहुल गांधींना समर्थन दर्शविण्यात आले.
            मोदी-अदानी महाभ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने काँग्रेस नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप सरकार खोटेनाटे खटले दाखल करून दडपशाहीने आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पनवेल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारच्या सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून ज्या पद्धतीने राहुल गांधींवर दडपशाही मार्गाने कारवाई केली जाते हे अत्यंत निषेधार्थ असल्याचे मत व्यक्त करीत केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने यावेळी निदर्शनेही केली.            याप्रसंगी काँग्रेस नेते जी आर पाटील, कॅप्टन कलावत, शशिकांत बांदोडकर, लतीफ शेख, निर्मला म्हात्रे, नौफिल सय्यद, शशिकला सिंह, वैभव पाटिल, हेमराज म्हात्रे, सुरेश पाटील, मल्लिनाथ गायकवाड, अरुण कुंभार, रामचंद्र पाटील, कांती गंगर, सुनील सावर्डेकर,अमित लोखंडे, विनीत कांडपिळे, जयवंत देशमुख, जनार्दन पाटील, विश्वजीत पाटील, प्रितेश साहू, भारती जळगावकर, राकेश चव्हाण, जेम्स जॉन, आर्यन सिंग, विलास माघाडे, सुरज नरोटे, नीता शेनॉय, मंजुळा कातकरी, संतोष चिखलकर, आदम ढलाईत, जयवंत देशमुख, शाहिद मुल्ला, ललिता सोनवणे, चेतन म्हात्रे, विलास म्हात्रे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोट: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी जरी रद्द झाली तरीही ते लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्यांच्यासाठी नेहमीच झटत राहतील याची जनतेलाही जाणीव आहे. केंद्र सरकार सूडबुद्धीने त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून खोटेनाटे खटले दाखल करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सूडबुद्धीचा बुरखा एक दिवस फाटल्याशिवाय राहणार नाही. या सर्व प्रकरणातून भाजप सरकारचा न्यायव्यवस्थेवर देखील दबाव असल्याचे दिसून येते. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. - सुदाम पाटील, जिल्हाध्यक्ष पनवेल काँग्रेस

 
थोडे नवीन जरा जुने