इनरव्हील क्लब पनवेल इंडस्ट्रियल टाउन अध्यक्षपदी सई पालवणकर
इनरव्हील क्लब पनवेल इंडस्ट्रियल टाउन अध्यक्षपदी सई पालवणकर
पनवेल दि. ९ (वार्ताहर) : इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन डॉ. शोभना पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या डॉ. शोभना पालेकर आणि इनरव्हीलच्या मान्यवर माजी अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. चार्टर्ड प्रेसीडेंट शुभांगी वालेकर आणि वैशाली ठाकरे यांनी सुंदर गणेश वंदना गाऊन सादर केली.


              मावळत्या अध्यक्षा कल्पना नागावकर यांनी वर्षभरात यशस्वीपणे पूर्ण झालेल्या समाजोपयोगी विविध उपक्रमांचा अहवाल पीपीटी द्वारे सादर केला. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. क्लबच्या संस्थापिका माजी अध्यक्षा वृषाली सावळेकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भावी अध्यक्षा सई पालवणकर यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुण्या डीव्हीसी डॉ.शोभना पालेकर यांच्या अध्यक्षतेखाली मावळत्या अध्यक्षा कल्पना नागावकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षा सई पालवणकर यांच्याकडे सोपवली. अध्यक्ष पदाचा स्वीकार करून नूतन अध्यक्षा सई यांनी आपल्या सर्व कमिटी मेंबर्सची ओळख एका सुंदर व्हिडीओ द्वारे करून दिली. यावर्षीच्या ’डहळपश र श्रळसहीं’ या थीम प्रमाणे वेगळे आणि अत्यावश्यक उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. महिला सबलीकरण, आर्थिक स्वावलंबन, विविध शाळांमध्ये जाऊन मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेले मोबाईल आणि इंटरनेटचे आकर्षण व अतीवापर यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल योग्य मार्गदर्शन, जेष्ठ नागरिकांसाठी मदत इ.विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याचा नूतन अध्यक्ष सई यांचा मानस आहे.
अध्यक्ष सई पालवणकर या स्वतः एक आहारतज्ञ आहेत. सर्वांनीच आपले शरीर आणि मन सुदृढ राहण्यासाठी सतत प्रयत्नशिल रहावे यावर त्यांचा विशेष भर आहे. त्याच अनुषंगाने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पौष्टिक लाकडी घाण्याचे खाद्यतेल देऊन करण्यात आले.
क्लब एडिटर प्रतिभा लादे संपादित ‘प्रतिबिंब’ या क्लब बुलेटिनचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी पीपी वृषाली सावळेकर यांच्या पुढाकाराने आणि आर्थिक सहकार्याने दोन गरजू महिलांना शिवण यंत्र देऊन त्यांना स्वकमाईचे साधन मिळवून दिले. समाजाचा मुख्य आधारस्तंभ असणार्‍या डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या डॉ. शोभना पालेकर यांची ओळख पीपी डॉ.साधना गांधी यांनी करून दिली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. शोभना पालेकर यांनी क्लबच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीचे भरभरून कौतुक केले. माजी अध्यक्ष कल्पना नागावकर यांच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नूतन अध्यक्षा आणि टीमला त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर शुभदा भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चार्टर्ड प्रेसिडेंट शुभांगी वालेकर आणि मोहीका कांडपिळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी इनरव्हील मेंबर्स, इतर क्लबचे प्रेसिडेंट रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कल्पेश परमार, सेक्रेटरी हितेश राजपूत, रोटरी अध्यक्ष डॉ. जय भंडारकर, सेक्रेटरी ऋग्वेद कांडपिळे, रोटरी ट्रस्ट चेअरमन अरविंद सावळेकर, माजी चेअरमन सुधीर कांडपिळे, सेक्रेटरी राजेंद्र ठाकरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सई पालवणकर यांचे पती सलील पालवणकर, सासूबाई, मामा-मामी, श्री.किशोर बागडे उपस्थित होते.
नूतन कमिटी : प्रेसिडेंट सई पालवणकर, सेक्रेटरी डॉ. राजश्री बागडे, आयपीपी कल्पना नागावकर, व्हाईस प्रेसिडेंट शुभदा भगत, जॉईंट सेक्रेटरी अर्चना फके, ट्रेझरर ममता सोलंकी, आयएसओ देवयानी पोटे , एडिटर प्रतिभा लादे, सिसी प्रिती गुरमे.
अ‍ॅडव्हायझरी कमिटी : डॉ.जयश्री पाटील, डॉ.साधना गांधी, नीता बोराडे, ज्योती गुंदेचा.


थोडे नवीन जरा जुने