ब्रदर फॉरेवर ग्रुप चिरनेर रांजणपाडा तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )सामाजिक बांधिलकी हे तत्व आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून उरण तालुक्यातील चिरनेर रांजणपाडा येथील सुशिक्षित असणारे ब्रदर फॉरेवर ग्रुप रांजणपाडा चिरनेरच्या 10 ते 12 तरुणांनी एकत्र येवून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलेवाडी तालुका उरण येथे दिनांक ७ जुलै २०२३ रोजी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर , शालेय लेखन साहित्य वह्या आणि पेन , प्रत्येकी छत्री असे शालेय उपयोगी साहित्य वाटप केले .
तसेच विद्यार्थ्यांना दुपारचे उत्कृष्ठ जेवण देण्यात आले. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांनी ब्रदर फॉरेवर ग्रुप रांजणपाडा चिरनेर यांचे या भेटी बद्दल आभार मानले. यावेळी वाडीवरील सुशिक्षित तरुण वर्ग रोशन सुरेश कातकरी, विजया दत्ता कातकरी हे उपस्थित होते.ब्रदर फॉरेवर ग्रुप चिरनेर रांजणपाडा या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
Tags
उरण