पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेमानले कळंबोली पोलिसांचे आभार

पाणीमीटर चोरीचा छडा लावल्याप्रकणारी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मानले कळंबोली पोलिसांचे आभार
पनवेल दि.२२ (संजय कदम) : कळंबोली वसाहतीमध्ये दोनशेपेक्षा अधिक पाणी मीटरची चोरी करणाऱ्या आरोपींना नुकतीच कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांनी कळंबोली पोलिसांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.


             शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर यांच्यासह उपशहर प्रमुख नरेंद्रसिंग होठी, उपशहर प्रमुख संजय भालेराव, शहर संघटक अरविंद कडव, विभाग प्रमुख महेश गुरव, उपविभाग प्रमुख तुषार निडाळकर, शाखाप्रमुख महेश दिघे यांनी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांची भेट घेऊन त्यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले
. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने कळंबोली आणि नवीन पनवेल येथे लाखो रुपये खर्च करून लावलेलं पाणी मीटर चोर मोठ्या शिताफीने पाईपसकट काढून नेत होते. यामुळे कमालीचे हैराण झालेल्या नागरिकांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कळंबोली पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांसह एका भंगार विक्रेत्याला अटक करून त्यांच्याकडून ५४ मीटर्स जप्त केले होते.


फोटो : वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांचे आभार मानताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर व इतर पदाधिकारी
थोडे नवीन जरा जुने