पनवेल दि.२२ (संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल शहर पदाधिकाऱ्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा नितीन ठाकरे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदाचा अंजुम बागवान यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव, युवासेनेचे पराग मोहिते, उपमहानगर संघटक किरण तावदारे, शहर संघटक राकेश टेमघरे, उप शहरप्रमुख रोहित टेमघरे, विभागप्रमुख प्रशांत नरसाळे, शाखाप्रमुख समीर कदम यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान यांची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच पनवेल शहरात आपले कर्तव्य बजावत असताना शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे सुद्धा उपस्थित होते.
Tags
पनवेल