बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे यांनी सामाजिक भान ठेऊन साजरा केला आपला ६० वा वाढदिवस

बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे यांनी सामाजिक भान ठेऊन साजरा केला आपला ६० वा वाढदिवस
पनवेल दि.२४ (वार्ताहर) : आपण सर्वजण समाजाचे काही देणे लागतो हा विचार घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेत कार्यरत असलेले विशेष सहाय्यक अरविंद मोरे यांनी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फणसवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर,वही, लिहिण्याचे साहित्य व मिठाई देऊन साजरा केला.


              याप्रसंगी उत्सवमूर्ती अरविंद मोरे, प्रा. डॉ. नीलिमा अरविंद मोरे, प्रा. हिमांशू अरविंद मोरे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या माजी शाखा प्रबंधक, प्रतिमा जाधव, संजीव सुदामे, प्रा.प्रज्ञा लातूरकर, प्रा. बिजली दडपे व शाळेच्या शिक्षिका नेहा मनोज गावंड व सविता राजाराम सरगर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. याप्रसंगी अरविंद मोरे म्हणाले की, आपण सर्वजण समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेनेच आज विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व मिठाई वाटून वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असल्याचे सांगितले. ह्या प्रसंगी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी बाळगावा ह्यासाठी प्रेरणादायी गोष्ट सांगून सर्वांचे लक्ष्य वेधले.


 त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षिका सविता राजाराम सरगर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेने खाते उघडण्यासाठी खुप मदत केल्याचे सांगितले. ह्यासाठी अरविंद मोरे यांचा पुढाकार प्रामुख्याने होता हे आवर्जून सांगितले. त्यांनी अरविंद मोरे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुंदर संचलन प्रा. प्रज्ञा लातूरकर यांनी करून सर्वांचे मने जिंकलीत. कार्यक्रमाची सांगता नेहा मनोज गावंड यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाच्या यशश्वीतेकरिता सुभाष भोपी, संजय घुटुकडे व विजय घुटुकडे यांनी अथक परिश्रम घेतले. थोडे नवीन जरा जुने