शिवाजी विद्यापिठाचे माजी कुलगुरू बॅ पी. जी पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे मॅनेजिंग

रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि शिवाजी विद्यापिठाचे माजी कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारा येथे रविवारी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अभिवादन केले.
या वेळी संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, वाय. टी. देशमुख यांच्या सुविद्य पत्नी वैशाली देशमुख, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय सावंत, रजिस्ट्रार डॉ. अरुणकुमार सकटे, माजी सहसचिव महाडिक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने