ला. डॉ. संजय पोतदार लायन रत्न पुरस्काराने सन्मानित

ला. डॉ. संजय पोतदार लायन रत्न पुरस्काराने सन्मानित
लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३१A २ तर्फे पनवेल लायन्स क्लबचे ज्येष्ठ सभासद ला. डॉ. संजय पोतदार यांना प्रांतपाल ला. मुकेश तनेजा यांच्या हस्ते लायन रत्न हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लायन्स क्लब मधील गेल्या अनेक वर्षांच्या निरपेक्ष योगदानाबद्दल ला पोतदार यांना सन्मानित केल्याचे ला मुकेश तनेजा यांनी सांगितले.ला संजय पोतदार यांनी पनवेल लायन्स च्या माध्यमातून १२५ हून अधिक अपंग व्यक्तीना तीन चाकी सायकल, गरजु महिलांना शिवण यंत्र, अपंगांसाठी टेलिफोन बूथ असे विविध उपक्रम करून आपले समाजसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे.याच समारंभात ला. संजय गोडसे एक्झिक्युटिव्ह कॅबिनेट खजिनदार, ला सुयोग पेंडसे झोन चेअरमन, ला के. एस पाटील साईट फर्स्ट, ला हेमंत ठाकूर, अध्यक्ष, ला नंदकिशोर धोत्रे सचिव, ला एस जी चव्हाण खजिनदार, ला नागेश देशमाने यांनाही गौरविण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने