उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराला कळंबोलीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद






उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराला कळंबोलीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल दि.२६ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहर शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराला कळंबोली वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी तज्ञ डॉक्टरांकडून आपली मधुमेह, रक्त दाब आदी तपासण्या करून घेतल्या. या शिबिराचे उदघाटन रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.



            शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिक दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी कोणते तरी सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहरच्या वतीने सेक्टर १ येथील शाखेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेऊन तज्ञ डॉक्टरांकडून आपले मधुमेह, रक्त दाब आदी तपासण्या करून घेतल्या. या शिबिरावेळी रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर संघटक डीएन मिश्रा, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहर संघटक अरविंद कडव, शहर संघटक अक्षय साळुंखे, 



उपशहर प्रमुख संजय भालेराव, उपशहरप्रमुख नरेंद्र होठी, उपशहरप्रमुख तुळशीराम मुकादम , युवासेना जय विजय कुष्टे, विभागप्रमुख महेश गुरव, विभागप्रमुख रजनीश पंडित, उपविभाग दत्ता भाडळे, शाखाप्रमुख संजय सरतापे, राजेश परशे, शाखाप्रमुख महेश दिघे, ज्योती मोहिते शहर संघटिका, रत्नमाला शिंदे शहर संपर्क संघटिका, योजना भिडे उपमहानगर संघटिका, मनीषा वचकल उपशहर संघटिका, श्रद्धा कदम उपविभाग संघटिका, निशा जाधव शाखा संघटिका, प्रतिभा डावरे सौ साधना खांडेकर सौ नंदा जाधव, सौ शोभा पाटील सौ सुरेखा फडके आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने