पनवेलकरांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले; शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने शालेय विद्यार्थ्यंसाठी मदतीचा हात







पनवेलकरांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले; शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने शालेय विद्यार्थ्यंसाठी मदतीचा हात 
पनवेल दि.१९(संजय कदम): गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान शिवसेना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने शालेय विद्यार्थ्यंसाठी मदतीचा हात म्हणून संपर्क क्रमांक जाहीर करून त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीला पूर आला आहे.



 मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पनवेल शहरातील मच्छिमार्केट जवळील वडघर पुल परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांसह इतर बांधवाना त्याच प्रमाणे खाडी नजीक राहणाऱ्या रहिवाश्याना पनवेल महानगर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला असून पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.



 सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच स्थानकात गाड्या येण्यास विलंब होत असल्याने ही गर्दी झाली. मुसळधार पाऊस पडत असल्याने तांत्रिक कारणामुळे उपनगरीय रेल्वेसेवा थांबविली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पनवेल महानगरपलिका क्षेत्रात राहणारे विद्यार्थी या मुसळधार पावसामुळे रस्त्यात कुठेही अडकले असल्यास सदानंद शिर्के, शहर प्रमुख, खांदा कॉलनी ९०८२२००६२८, गिरीष दशरथ धुमाळ, शहर समन्वयक, कळंबोली ९८९२९७२००४, ८७७९५९६८२५, प्रवीण जाधव, शहर प्रमुख, पनवेल ९०८२२४३९०१, यतीन देशमुख, शहर प्रमुख, नवीन पनवेल ९९३०३३८७९९, संतोष गोळे, शहर संघटक, कामोठे ९८१९८७८२५६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्ववभूमीवर पनवेल महानगरपालिका, अग्निशामक दल, पोलीस प्रशासन, तहसिदार कार्यालय कोणतीही परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज आहे.


थोडे नवीन जरा जुने