पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक सुनिल गिरी यांनी गुन्हे शाखा विभागात एंट्री
पनवेल दि.१९(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यकर्त असणारे व आपल्या कामगिरीने अनेक गुन्हांची उकल करणारे व ज्यांची पनवेल परिसरात ओळख सिंघम अधिकारी म्हणून होती असे सुनिल गिरी यांची गुन्हे शाखा विभागात एंट्री झाल्याने अनेक गुन्हे गारांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल गिरी हे सन २०१८ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उप निरीक्षक पदावर भरती झाले असून त्यांनी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर सी. ६०, गडचिरोली सारख्या अतिदुर्गम नक्षल भागात कर्तव्य केले आहे. गडचिरोली येथे कर्तव्या दरम्यान त्यांनी अनेक विशेष मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेवून नक्षलवाद्यी हल्यांचा प्रयत्न उघळुन लावला आहे. तसेच त्यांनी रोड ओपनिंग दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यात पुरून ठेवलेले भुसुरुंगांचा शोध लावून नक्षलवाद्यांचा प्रयत्न निष्फळ केला. गिरी यांनी अनेक नक्षलवाद्यी चकमकींत भाग घेतला आहे
ते धाडसी, कर्तव्याप्रती एकनिष्ठ व प्रामाणिक पोलीस अधिकारी असल्याने त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेबदद्ल त्यांना वरिष्ठांनी वेळोवेळी सन्मानचिन्ह व बक्षीसे देवून गौरविले आहे. पोउपनि गिरी हे सन २०२१ पासून पनवेल शहर पोलीस ठाणे येथे नेमणूकीस असून त्यांनी आज पावेतो खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार, घरफोडी, चोरी, चैन स्नॅचिंग अशा विविध प्रकारच्या गंभीर व क्लिष्ट स्वरूपातील गुन्हयांचा उत्कृष्टरित्या तपास केला आहे. या कामगिरीची दाखल घेत त्यांची नवी मुंबई गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे अनेकांनी भेट घेऊन अभिनंद केले आहे.
Tags
पनवेल