पूरग्रस्त चिरनेर गावाच्या मदतीला धावून गेले माजी आमदार मनोहरशेठ भोईर.


पूरग्रस्त चिरनेर गावाच्या मदतीला धावून गेले माजी आमदार मनोहरशेठ भोईर.

चिरनेर ग्रामस्थांच्या सोबत माजी आमदार मनोहरशेठ भोईर स्वतः पाण्यात उतरुन केली पुर परिस्थितीची पाहणी.

उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )गेल्या दोन दिवसापासून उरण तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून आज पावसाच्या हाहाकारामुळे चिरनेर गावाला पावसाचा मोठा फटका बसला असून संपूर्ण चिरनेर गावामध्ये घराघरांमध्ये पाणी घुसलेले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे वृत्त समजतात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे चिरनेर ग्रामस्थांच्या मदतीला धावून गेले असून चिरनेर पुरग्रस्त ग्रामस्थांना धीर दिला, इतकेच नव्हे तर ग्रामस्थां बरोबर स्वतः माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या सोबत पाण्यात उतरून संपूर्ण पुरस्थितीची पाहणी केली. 
या पूर परिस्थितीमध्ये चिरनेर गावातील ३५० ते ४०० घरे बाधित होऊन या ग्रामस्थांच्या अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरातील महत्त्वाच्या वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, याबाबत त्यांनी उरण तहसीलदार व शासकीय अधिकाऱ्यांना लगेच पंचनामे करून या ग्रामस्थांना नुसकान भरपाईसाठी कारवाई करून लगेच मदत करण्याची विनंती केली आहे, तसेच रायगड जिल्हाचे कलेक्टर यांना ई-मेल द्वारे या सर्व परिस्थितीची माहिती देऊन त्वरित उपायोजनासाठी कळविले आहे, 
 यामध्ये असे दिसून येते की चिरनेर गावाला सांडपाणी पाहून नेणारे पाईप लाईन ही जमिनीत खोलवर रुतली असल्याने सांडपाणी वाहून नेण्यास अडथळा येत आहे, हे जर वेळेस बदलले नाही तर पुन्हा एकदा चिरनेर गावामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते असे दिसून येत आहे.या त्यांच्या दौऱ्याच्या वेळी उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पं.स.उरण माजी सभापती भास्कर मोकल, उप तालुका संघटक के. एम. घरत,शाखाप्रमुख समाधान ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे सुरेश पाटील,पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ त्यांच्यासोबत उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने