कारचालकाची स्कुटीला धडक; पतिपत्नीसह दोन लहान मुले जखमी


कारचालकाची स्कुटीला धडक; पतिपत्नीसह दोन लहान मुले जखमी
पनवेल दि.२७ (संजय कदम) : दुचाकीने दाम्पत्य आपल्या दोन मुलींसह जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने दुचाकीला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील कुटुंब जखमी झाल्याची घटना तळोजे फेज २ परिसरात घडली आहे.              फिर्यादी महेश घाडीगावकर हे त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलींसह त्यांच्या ताब्यातील स्कुटी क्र. (MH01EG6095) व स्कुटी क्र. (MH-46- CF-7249) वरून ते राहत असलेल्या तळोजे फेज २, सेक्टर २७ मधील आसावरी इमारत इथून जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कारचालकाने (एमएच ०३ सीपी ८००२) त्यांना ठोकर दिली. या ठोकरमध्ये महेश स्कुटीसह रोडवर खाली पडल्याने त्यांच्या डाव्या हाताचे मनगटाजवळ फैक्चर होवुन गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांची पत्नी व दोन मुलींना देखील किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध तळोजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने