ट्रेलरला पाठीमागून धडकल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यूट्रेलरला पाठीमागून धडकल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू 
पनवेल दि.२७ (संजय कदम) : अनधिकृत व निष्काळजीपणे रोडच्या बाजुला पार्क केलेल्या ट्रेलरला पाठीमागच्या बाजुस धडकल्याने गंभीर जखमी होऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नावडे फाटा येथे घडली आहे.


              घोटगाव येथे राहणारा किरण पवार हा तरुण त्याच्या ताब्यातील पल्सर NS मोटार सायकल घेऊन तळोजा औद्योगिक वसाहतीमधील नावडेफाटा ते कल्याण कडे जाणान्या रोडवर व्हीनस कंपनीच्या समोरून जात असताना अनधिकृत व निष्काळजीपणे रोडच्या बाजुला पार्क केलेला ट्रेलरला (आरजे ५१ जीए ४४५८) पाठीमागच्या बाजुस धडकल्याने त्याचे कपाळास चेहन्यावर व हातापायांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. याबाबत ट्रेलर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने