श्री साई नारायण बाबा आश्रम येथे श्रीगुरु पौर्णिमा उत्सव साजरा
पनवेल दि.०३ (संजय कदम) : प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत आज पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात श्रीगुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साई नारायण बाबा आश्रमात धार्मिक कार्यक्रमांसह गरीब मुलांना मोफत दूध आणि अन्न वाटप करण्यात आले.
पनवेलसह रायगड नवीमुंबई मधील लाखो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साई नारायण बाबा आश्रम येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीगुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज सकाळपासून आश्रमात श्री व्यास पूजन व महायज्ञ, परम गुरुजींच्या पावन चरण पादुकेचा महाअभिषेक त्याचप्रमाणे वेदमंत्र साधना
, यज्ञोपवीत धरणं, श्री महामंत्रोपदेश, श्रीगुरु पौर्णिमेच्या महत्वावर प्रवचन, महा श्री चरण पूजा असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच गरीब मुलांना मोफत दूध आणि अन्न वाटप असे सामाजिक उपक्रम पार पडले. तसेच आश्रमात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, राम थडानी, डॉ शकुंतला भटिजा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
पनवेल