पनवेल जिल्हा सहसचिव या पदावर नियुक्ती
जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
पनवेल /प्रतिनिधी:- अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असणाऱ्या भाऊसाहेब आहेर यांना पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या सहसचिव पदावर नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांच्या हस्ते शनिवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कळंबोली स्थित पारनेरकर असणारे भाऊसाहेब आहेर गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वास्तव्यास आहे. शरदचंद्रजी पवार यांना आदर्श मानून त्यांनी राजकारण व समाजकारणाला सुरुवात केली. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि सामाजिक क्षेत्रातही घरी कामगिरी केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पूर्वीपासून सक्रिय आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे ,पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आहेर यांनी पक्षाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे.
त्यांची पक्षनिष्ठा आणि या पाठीमागे केलेल्या कामा बद्दल जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा सहसचिव म्हणून शनिवारी नियुक्ती केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत आणि बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आपली जबाबदारी असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
Tags
पनवेल