मैत्रेय प्राणिक हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच मोफत हिलींग द्वारे उपचार शिबीर






जाणीव एक सामाजिक संस्था आणि मैत्रेय प्राणिक हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच मोफत हिलींग द्वारे उपचार शिबीर शनिवार दि ०१/०७/२०२३ रोजी बल्लाळेश्वर मंदिर सभागृह, वीर सावरकर चौक, पनवेल येथे दुपारी ०४.०० ते सायंकाळी ०७.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.


   प्राणिक हिलींग ही *नो टच, नो मेडिसिन* यावर आधारित आहे.   ही उपचार पद्धत कित्येक वर्षे भारतातच नाही तर इतर अन्य देशातही सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव एक सामाजिक संस्था चे संस्थापक, अध्यक्ष मा नितीन जयराम पाटील यांच्या तर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ' आपल्याकडे नवी मुंबई सह पनवेल मधीलही अनेक नागरिक उपचार घेत असल्याचे ' प्राणिक हिलींग सेंटरच्या प्रमुख हिलर सौ मेघना कदम आणि सई कुळकर्णी यांनी सांगितले. पनवेल वासीयांनाही या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा नितीन पाटील यांनी सांगितले.   


   सदर शिबिरास येऊ इच्छुकांनी *प्रसाद हनुमंते 7666327009, सौ मेघना कदम 839765907, सौ सई कुळकर्णी 9892715472, आशिष सावंत 9321196656* यांच्याशी संपर्क करून आपली नोंदणी करावी. किंवा ऑन लाईन http://titiro.com/5n6jnx6d  या गोगल लिंक वर आपली नोंदणी करावी


थोडे नवीन जरा जुने